Hoping to fulfill the wish of my late uncle who wanted to bring all Sapres together in a family reunion.
History
पूर्वी गोव्यात पोर्तुगिझांचा अंमल होता त्या सुमारास साधारणपणे ४०० वर्षांपूर्वीच्या आसपास बंडाळी होऊन पळापळ झाली.
तेथे राहणारे सप्रे यांनी आपले कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांच्या मूर्ती वेलिंगहून हलवून जंगलात सुरक्षित स्थळी कुट्टाळी* गावाजवळ सांकवाळ** येथे त्यांची प्रतिष्ठापना केली.
मु.पो. कोंढ्रण (जि. रत्नागिरी ता. संगमेश्वर) वासी "अत्रि" गोत्रीय श्री. सप्रे कुलोत्पन्न बंधू भगिनींनो आपल्या पुढे "कोंढ्रणवासी" सप्रे कुटुंबीयांची वंशावळी संशोधित करून ती आतापर्यंतच्या पिढीपर्यंत प्रसिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझे चुलते कै. माधव रघुनाथ सप्रे यांच्याकडून प्राप्त झालेल्या ५० वर्षांपूर्वीच्या प्रतीवरून सदरसंशोधित वंशावळी प्रत तयार केली आहे. सबब ती अधिकृत व विश्वसनीय आहे.
आपले कुलदैवत "श्री शांतादुर्गा लक्ष्मीनृसिंह" आपली ग्रामदेवता "श्री जाखाई देवी" आहे. आपले मूळ पुरुष कै.गणेश अनंत सफरे (सप्रे) यांना एकूण तीन मुलगे १) बाजी २) लक्ष्मण ३) अंताजी. पैकी थोरला मुलगा कै. बाजी यांचाचवंशविस्तार मोठा असून त्यांची पुढील पिढी मुंबईत स्थिरावलेली आढळते. कै. लक्ष्मण व अंताजी या दोघांचा विस्तारतिसऱ्या पिढीत खुंटलेला आढळतो. सबब त्यांच्या पुढील पिढीची माहिती उपलब्ध नाही.
आपले मूळ पुरुष कै. गणेश अनंत सफरे (सप्रे) हे साताऱ्याहून कोल्हापूरजवळील मलकापूर येथे आले व संस्थानिकांचे पौरोहित्य करू लागले. अनेक वर्ष पौरोहित्य केल्यानंतर मालकापूरचे संस्थानिक प्रसन्न होऊन त्यांनी सुमारे १७२७ चे सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातीलसंगमेश्वर तालुक्यातील बाव नदीच्या काठाशी असलेला निसर्गरम्य हिरवागार वनश्रीने नटलेला "कोंढ्रण"हा गाव आपले मूळ पुरुष यांना आंदण दिला.
साताऱ्याहून "कऱ्हहाटक” प्रांताच्या सीमा पार करून आपले पूर्वज उत्तर दिशेने कोकणात गेले म्हणून आपण "कऱ्हाडे ब्राम्हण" म्हणून प्रसिद्धी पावले.
आपले गोत्र व प्रवर खालीलप्रमाणे म्हणण्याची प्रथा आहे जिज्ञासूंच्या माहितीसाठी देत आहेत.
"आत्रेयार्चनानसश्यावाश्र्वेति त्रिप्रवरान्वित अत्रि गोत्रोत्पन्न नाम शर्माहं ऋग्वेदांतर्गत आश्र्वलायन शांकल शाखाध्यायी"